Sunday, 6 October 2019

मतदान


आता आपल्याला या काळात नवीन देशभक्ती ची व्याख्या शिकून घ्यावी लागते कारण आपण जर सरकारच्या निर्णय विरधोत बोलोलो तर आपण देशद्रोही होतोय नाहीतर  तथागतीत देशभक्त लोक पाकिस्तान मध्ये जान्याचा सल्ला देतात हे पूर्वी तर नव्हते आता हे लोण वाढत आहे .मला कळत नाही जर आपण 370ला काढून टाकले याला विरोध केला तर  आपण देशद्रोही कसे काय होऊ शकतो  मुद्धा फक्त 370चा नाहीतर अशेस खुपसारे मुद्ध्ये आहेत .

आता आपल्या देशात सोयीस्कर देशभक्ती सुरुय जे मुद्ध्या पटणार नाही त्याला देशभक्तीची जोडायचे .जिथं सोयीस्कर आहे तिथंच देशभक्ती दाखवायची ही प्रवृत्ती खूप वाईट आहे  .आपण शेवटी सगळे पाकिस्तानवर का येतोत आपण त्याच्यापेक्षा खूप प्रगती केली आहे वापस त्यांच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा आपण युरोपीय देशांबरोबर स्पर्धा  केली पाहिजे. आपण खूप साऱ्या कामामध्ये मागे आहोत आपण ते पहिले सुधारले पाहीजे.  लोकानी आर्थिक विषयावर फोकस केले पाहीजे आपण पाकिस्तानच्या भविषयापेक्षा स्वतःच्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे . आपल्याला राम मंदिरापेक्षा नोकरी हवी असते आपण मूळ मुद्ध्या कडे लक्ष द्यायला पाहिजे . आपण भावनिक मुद्द्यापेक्षा  आर्थिक मुद्द्याकडे लक्ष द्ययाईला पाहिजे.
आपण जर हे नाही शिकलो तर आपण कधी प्रगत होऊ शकत नाही .आपला देशाचा विकास आकड्यामध्ये दिसण्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी दिसला पाहीजे हे तरी सर्व लोकांनी मान्य करायला पाहीजे .हे लोकांना कळलं नाहीतर मतदान करून किंवा किती सरकार येऊन गेले तरी काय फायदा नाही . त्यामुळे लोकानी सजग होऊन मतदान केले पाहीजे .